खेडमधील शेतकऱ्यांना पं. स. कडून आवाहन

खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील शेतकरी बंधू भगिणींना जिल्हा परिषद सेस २०२५-२६ अंतर्गत कृषि विदयापीठ, महाबीज व राष्ट्रीय बीज निगम मार्फत उपलब्ध भात बियाणे खरेदीवर ७५ टक्केअनुदान किंवा जास्तीत जास्त रक्कम रु.१५०० इतके अनुदान देण्यात येत आहे.
शेतक-यांनी विहीत नमुन्यातील अर्जा सोबत भातबियाणे खरेदी पावती, भात शेतीची नोंद आसलेला, ७/१२ उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बैंक पासबुकची झेरॉक्स जोडुन प्रस्ताव पंचायत समिती खेड कार्यालयात जमा करावा. जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी (गट-अ) पंचायत समिती खेड यांनी केले आहे.