खेड(प्रतिनिधी)गेल्याच वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेल्या खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे अक्षरशः बारा वाजले आहेत नव्या बांधलेल्या शेडला अवकाळी पावसातच धबधब्याप्रमाणे गळती लागले आहे . याचा सर्वाधिक फटका कोकणात येणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांना बसत आहे.
खेड स्थानकावर सुशोभीकरणाचे काम नुकतेच झाले होते. मात्र अवकाळी पावसात नव्या शेडची गळती सुरू झाली आहे. ही गळती केवळ बांधकामातील हलगर्जीचं लक्षण नाही, तर प्रशासनाची बेपर्वाहीही अधोरेखित झाली आहे. हजारो स्क्वेअर फुट असलेल्या रेल्वे स्थानकासमोरील पात्राची शेड गळत असल्यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी शेडमध्ये देखील भिजत आहेत अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे त्या आधीच नव्याने बांधलेल्या शेडला मोठ्या प्रमाणावरती गळती लागल्यामुळे खर्च करण्यात आलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.










