खोपी तांबडवाडी येथील मारहाणीत एक जखमी; तिघांविरोधात गुन्हा दाखल

crime marhan
खेड  (प्रतिनिधी) 
तालुक्यातील खोपी तांबडवाडी येथील संतोष कृष्णा भोसले हे आपल्या राहत्या घराचे बांधकाम करीत असताना या बांधकामास तिघांनी हरकत घेऊन संतोष भोसले यांना मारहाण केली. यात ते जखमी झाले . हि घटना  १ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी संतोष भोसले यांनी तक्रार दिल्यानुसार येथील पोलीसांनी तिघांविरोधात गुन्हा  गुन्हा दाखल केला आहे.
सूर्यकांत तुकाराम भोसले , उमेश तुकाराम भोसले व एक महिला ( रा. खोपी तांबडवाडी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या या तीन जणांची  नावे आहेत. फिर्यादी संतोष कृष्णा भोसले यांना घराचे बांधकाम करण्यास हरकत घेऊन त्यांना  सुर्यकांत भोसले यांनी हाताने ठोशाने डाव्या गालावर जोरात बुक्की मारल्याने त्यांच्या डाव्या बाजूची दाढ तुटून त्यातून रक्त येऊन दुखापत केलेली आहे.तसेच आरोपी उमेश भोसले यांनी संतोष भोसले यांच्या डाव्या छातीवर जोरात हाताच्या ठोशाने बुक्की मारून शिवीगाळी, दमदाटी केली .तसेच घराचे बांधकाम करण्यास सुरुवात केलीस तर तुला बंदुकीच्या गोळीने ठार मारून टाकीन अशी धमकी दिली , म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.