जैतापूर (वार्ताहर) : इयत्ता दहावी परिक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या सरस्वती विद्यामंदिर पाचलच्या अर्थव मोरे व अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवलीच्या कु. आदिती वायबसे यांचा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी प्रत्येकी पाच- पाच हजार रुपये प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत राजापूर तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी 5000 रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्याचे जाहीर केले होते.
बुधवारी सरस्वती विद्यामंदिर पाचल येथे पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल, अर्जुना खोरे विकास मंडळ कारवली, आणि पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघ मीठगवाने यांच्या संयुक्त कार्यक्रमात जेष्ठ नाटककार,वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गुणगौरव समारंभ पार पडला.
यावेळी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक सक्रे, सरचिटणीस रामचंद्र वरेकर, सहसचिव किशोर नारकर, संचालक आण्णा पाथरे, अर्जुना विकास खोरे विकास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र वरेकर, सरचिटणीस डॉ.विश्वास जाधव, पंचक्रोशी जेष्ठ नागरिक संस्था अध्यक्ष विलास चेऊलकर, उपाध्यक्ष एकनाथ आडीवरेकर,सचिव रमेश राणे,राजापूर तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष राजन लाड, स्प्लँश आर्ट्स अकॅडमी जैतापूर संचालक राकेश दांडेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान पाचल हायस्कुल, कनिष्ठ महाविद्यालय छत्रालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पाचल विभागात विभागात प्रथमच आलेले नाटककार गंगाराम गवाणकर यांचा नाट्यकर्मी व उपस्थित सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
या कार्यक्रप्रसंगी विजय मोर्ये,विकास कोलते,सुरेश साळवी गुरुजी, बाबा सावंत, पाचल हायस्कुलचे मुख्याध्यापक तानाजी देसाई , माजी विद्यार्थी फेडरेशन असोसिएशन चे अध्यक्ष राजू रेडीज, सुशील नारकर, ,अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवली चे मुख्याध्यापक राजेश तेरवणकर या कार्यक्रमाचे व्यवस्थापक आणि पत्रकार उमेश दळवी, किसान व कन्या छात्रालय पाचल अधीक्षक विद्या वाकडे, शैलेश हुंदळेकर सर,सहित शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थितीत होतें. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविस्कर सर यांनी केले.












