कणकवली देवगड बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी छेडले आंदोलन

भगवती हायस्कूल मुणगे येथे एसटी बस रोखत पालक आक्रमक

कणकवली देवगड बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी छेडले आंदोलन

माजी जि .प उपाध्यक्ष सदाशिव ओगले, माजी सभापती सुनील पारकर,डॉ. मनोज सारंग आंदोलनात सहभागी

देवगड प्रतिनिधी:
कणकवली येथून दुपारी दोन वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी कणकवली ते देवगड ही देवगड आगाराची बस गेली अनेक वर्षे श्री भगवती मुणगे हायस्कूल येथे ४.१५ दरम्याने येत होती. सध्या स्थितीत बस कणकवली आगरमधून वेळेवर सुटत नसल्याने श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा त्यापेक्षाही उशिराने ही बस येत आहे,देवगड आगाराला लेखी निवेदन देऊन देखील एसटी बस वेळेत येत नसल्याने सोमवारी श्री.भगवती हायस्कूल मुणगे समोर शालेय विद्यार्थ्यांसमवेत पालक
आणि ग्रामस्थानी रस्ता रोको आंदोलन करत कणकवली देवगड बस काही वेळ थांबून ठेवण्यात आली होती जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला,
यावेळी जि.प माजी उपाध्यक्ष सदाशिव ओगले, माजी सभापती सुनीलभाई पारकर, माजी सभापती डॉ. मनोज सारंग, श्री भगवती हायस्कूल संस्था पदाधिकारी संजय बांबुळकर,सरपंच अंजली सावंत,आबा पुजारे,चंदन दळवी,धर्माजी आडकर,मनोज सावंत,दिगंबर बागवे,सुनील पुजारे, शिवदास रासम, नाना बागवे आदींसह पालक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते,
या बाबत देवगड आगार प्रमुखांनी
जि.प माजी उपाध्यक्ष सदाशिव ओगले यांच्या सोबत फोनद्वारे संवाद साधून मंगळवार पासून बस फेरी नियमित वेळेत येईल असे आश्वासन दिले, आगार प्रमुखांच्या आश्वासननंतर
आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, सदर बस फेरी नियमित वेळेत येत नसल्याने श्री भगवती मुणगे हायस्कूल येथे शिक्षण घेणाऱ्या मिठबांव हिंदळे, दहीबांव,तांबळडेग येथील विद्यार्थ्यांना श्री भगवती मुणगे हायस्कूल संस्था पदाधिकारी यांना खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांना घरापर्यंत सोडायला जावे लागत आहे,