पद्मश्री तलयोगी पंडित सुरेश तळवलकर, अनंत जोशी यांची उपस्थिती
रत्नागिरी । प्रतिनिधी :दिनांक 14 आणि 15 जून या दोन दिवसांमध्ये तबला व पखवाज प्रशिक्षण आणि संवादिनी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. तलायोगी पंडित सुरेश तळवलकर या संपूर्ण कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत तर संवादिनीचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध संवादिनीवादक आणि अत्यंत कल्पक कलाकार श्री. अनंत जोशी करणार आहेत.
या दोन्ही कलाकारांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा रत्नागिरीतील सर्व कलाकारांना मिळावा म्हणून ही कार्यशाळा हे आर्ट सर्कलचे महत्वाचे पाऊल आहे.
कार्यशाळेची सुरुवात दिनांक 14 जून शनिवार दुपार 3.00 वाजता होणार असून ती रविवार 14 जून संध्याकाळ 6.00 पर्यंत सिद्धिविनायक मंगल कार्यालय, शिवाजीनगर येथे असेल. कार्यशाळा सशुल्क असून चैतन्य पटवर्धन: 8552899444 (संवादिनी) आणि हेरंब जोगळेकर: 9422630660 (तबला पखवाज) यांच्याशी संपर्क साधावा









