Relief! Monsoon entry in the state on ‘this’ day, how will it rain this year?
मुंबई : मे महिन्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे.
नागरिक घामाने आणि कडक उन्हाने कंटाळले असतानाच पाऊस येण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याने मोठे अपडेट दिले आहेत. राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ९५ टक्केच पाऊस पडणार आहे. यंदा राज्यभरात पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे मान्सून ४ जून म्हणजेच रविवारी केरळमध्ये दाखल होणार आहे. यासोबतच यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असून विदर्भासाठी आनंदाची बातमी म्हणजे विदर्भात 100 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव प्रदेश, दक्षिण बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागरावर नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे IMD ने म्हटले आहे.












