RATNAGIRI: ओरिसात झालेल्या रेल्वे अपघातामुळे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन रद्द

Inauguration of Madgaon-Mumbai Vande Bharat Express canceled due to train accident in Orissa

रत्नागिरी : ओरिसात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे ३ जून रोजी होणारे उद्घाटन रद्द करण्यात आले आहे. ओरिसातील बालासोर जिल्ह्यात तीन गाड्यांना झालेल्या भीषण रेल्वे अपघातात अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला.

मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेसला गोव्यातील मडगाव स्थानकावर हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार होते. मात्र, रेल्वे अपघाताच्या दुर्घटनेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.