शृंगारतळी बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकेलाही फटका

गुहागर l प्रतिनिधी :गुहागर- विजापूर महामार्गावर शृंगारतळी बाजारपेठमधील बस स्थानक जवळ वाहतूक कोंडी झाली यामुळे काही काळ नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

गुहागर एस टी आगारातून सुटणाऱ्या एस टी बस शृंगार तळी मार्गे चिपळूण व अन्य ठिकाणी ये जा करीत असतात.

शृंगारतली बस स्टॉप येथे थांबणाऱ्या एसटी बसेस रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने उभे राहत असल्या कारणाने काही काळ वाहतूक कोंडी होत आहे.

 

गुहागर येथून रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिका शृंगारतळी येथे ह्याच वाहतूक कोंडीत काही काळ अडकली होती .

येथील काही नागरिकांनी भर पाऊसात वाहतुक सुरळीत करून रुग्णवाहिकेला मार्गस्थ होण्याकरिता रस्ता मोकळा करून दिला. येथे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.या

वाहतूककोंडी वर कायम स्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालकातून होत आहे