ग्रामस्थांनी मानले आभार
चिपळूण (प्रतिनिधी) : आकलेतील विश्वशांती बुद्ध विहारासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा आकले शाखा व पंचशील विकास मंडळ मुंबई यांच्यातर्फे आमदार शेखर निकम यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजकल्याणच्या माजी सभापती ऋतुजा जाधव, माजी सदस्या दीप्ती महाडिक, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सचिव प्रशांत यादव, माजी सभापती मनोहर मोहिते, पंचायत समितीचे माजी सभापती बळीराम शिंदे, माजी नगरसेवक उमेश सकपाळ, युवा माजी तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे या सर्वांनी सहकार्य केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विनेश मोहिते यांनी यासाठी पाठपुरावा केला. तसेच आकले भिमराज क्रीडा मंडळ यांनी विहारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची २ फुट उंचीची प्रतिमा भेट दिली. सत्कारावेळी राजू जाधव, भाऊ जागुष्टे, गणेश गजमल, सतीश शिंदे, बाबू मोहिते, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विजय मोहिते, सचिव विशाल मोहिते, विश्वशांती बुद्ध विहार नूतन बांधकाम समिती अध्यक्ष विकास मोहिते, उपाध्यक्ष सतिश मोहिते, वैभव मोहिते, पंचशील विकास अध्यक्ष जाधव, उपाध्यक्ष मोहिते, सल्लागार संदीप मोहिते, सहसचिव मोरे, विजय मोहिते, माजी सरपंच विशा मोहिते तसेच जयेश्री जाधव, शारदा मोहिते उपस्थित होते. प्रास्ताविक सल्लागार संतोष मोहिते, सूत्रसंचालन अरुण मोहिते तर आभार विनेश मोहिते यांनी मानले.
फोटो फाईल- सीपीएन२६-३










