ते फोटो काढायला बाहेर पडले आणि गाडीने थेट दरीत कोसळली

आरेवारे येथील घटना; चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान 

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील आरेवारे येथे फोटो काढण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांची रिकामी चारचाकी गाडी अचानकपणे 100 ते 150 फूट खोल दरीत पडून गाडीचे नुकसान झाले. ही घटना बुधवार 28 मे रोजी दुपारीच्या सुमारास घडली.

बुधवारी दुपारी सांगलीतील एक दाम्पत्य गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होते. ते आरेवारे येथे आले असता त्याठिकाणी फोटो काढण्यासाठी त्यांनी आपली गाडी तेथे थांबवली. त्यांची गाडी गियरमध्ये तसेच हॅन्डब्रेक ओढला होता असे दाम्प्त्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतू हे दाम्पत्य गाडीतून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच त्यांची गाडी आरेवारेच्या खोल दरीत पडून तिचे नुकसान झाले. ही बाबत तेथील स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ग्रामीण पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. सायंकाळी उशिरापर्यंत गाडी दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु होते