सतीची दुर्दैवी प्रथा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बंद केली- इतिहास संशोधक ज्योतीताई तोरस्कर

चिपळुणातील भारतीय जनता पार्टीच्या महिला मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद

चिपळूण (प्रतिनिधी) : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे आजच्या स्त्रीला मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आहे. योवानांच्या काळात स्त्रीला असणाऱ्या मर्यादा पाहता त्यांचे काम हे स्त्रीला विचार करण्यास भाग पाडणारे होते. खरंतर सतीची दुर्दैवी प्रथा ही इंग्रजांनी बंद केलेली नसून ती अहिल्यादेवी होळकर यांनी बंद केली. परंतु सतीची दुर्दैवी प्रथा बंद करण्याचे श्रेय हे इंग्रज घेतात हे दु:ख आहे. मंदिरे, विहिरी, देशप्रेम, रणनीती, राज्यसत्ता या सर्वांचा उपयोग महाराष्ट्र जगविण्यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला, असे प्रखर मत इतिहास संशोधक ज्योतीताई तोरस्कर यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिपळुणातील महिला सन्मान पुरस्कार सोहळा प्रसंगी व्यक्त केले.
चिपळूणातील ब्राह्मण सहाय्यक संघ हॉल येथे महिलांच्या गर्दीने भरलेल्या सभागृहात चिपळुणातील विविध क्षेत्रातील दैदीप्यमान काम करणाऱ्या ८५ महिलांचा सत्कार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरी तर्फे हा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, इतिहास संशोधक ज्योतीताई तोरस्कर, जिल्हा महिलाध्यक्ष वर्षा ढेकणे, चित्रा चव्हाण, अमित केतकर, विनोद भुरण, शशिकांत मोदी, स्नेहा मेस्त्री, शीतल रानाडे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक शशिकांत मोदी यांनी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटाबद्दल सौ. ढेकणे, सौ. चव्हाण, सौ. मेस्त्री, सौ. रानडे यांनी ३०० पेक्षा अधिक उपस्थित महिलांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मंदार कदम यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. सावंत व श्री. मोरे यांनी भारतीय जनता पार्टीचे काम याचा धावता आढावा घेतला. उपाध्यक्ष रामदास राणे, विनोद म्हस्के, उदय घाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी अनिता राजेशिर्के, आशिष खातू, विजय चितळे, सारिका भावे, प्रणाली सावर्डेकर, पूनम काजारी, संदिप भिसे, विनायक वरवडेकर, निनाद आवटे, रत्नदीप देवळेकर, उल्हास भोसले, प्रणय वाडकर, अभय चितळे, संदेश ओक, विनोद भोबस्कर, अभिजित सावर्डेकर, विमल लढ्ढा, नुपूर बाचीम, नुपुरा मुळे, मृणाल शेट्ये, प्रियल जोशी, परिणीता सावंत, नुपूर बाचीम, शितल दिंडे, स्नेहा चव्हाण, रिहाना बिजले, वर्षा जागुष्टे, तृप्ती कदम, ओवी भावे आदी उपस्थित होते.