सुकिवली येथे 16 हजार 695 रुपयांचा गांजा, दुचाकी व मोबाईलसह एकाला केले जेरबंद 

खेड l प्रतिनिधी :विक्रीसाठी गांजा घेउन आलेल्या संशयिताला खेड पोलिसांनी 16 हजार 695 रुपयांचा गांजा, दुचाकी व मोबाईल अशा एकूण 1 लाख 6 हजार 795 रुपयांच्या मुद्ेदमालसह ताब्यात शनिवार 31 मे रोजी 9.30 वा.सुमारास मौजे सुकिवली चोरदार नदीच्या पुलावरुन ताब्यात घेतले.

शंकर विनोद पारदे (29 सध्या,रा.सुकिवली बौध्दवाडी खेड मुळ रा.तुळजापूर बाजारपेठ जि.धाराशिव) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. खेड पोलिसांनी शनिवारी एक संशयिता गांजा घेउन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्याठिकाणी वेषांतर करुन पाळत ठेवली होती. रात्री 9.30 वा.सुमारास एक संशयित दुचाकीवरुन तिथे आला. पोलिसांची खात्री पटल्यावर त्यांनी त्याच्या दुचाकीची झडती केल्यावर त्यामध्ये गांजा हा अमली पदार्थ प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये मिळून आला. त्याच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे,अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी भागौजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे,श्रीकृष्ण येवले,पोलिस काँस्टेबल रुपेश जोगी,रोहित जोयशी,अजय कडू,राम नागुलवार,वैभव ओहोळ यांनी केली