रत्नागिरी सायबर पोलिसांची कामगिरी
रत्नागिरी ः प्रतिनिधी :मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करत वृध्दाची तब्बल 61 लाख19 हजार 80 रुपयांची ऑनलाईन फसवण्ाूक करणार्या संशयिताच्या सायबर पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले.
राजीव विश्वनाथ तिवारी (47,रा.शिवनगर कॉलनी पहाड गंज उत्तरप्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी शहरातील एकाल वृध्दाला मी
मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असून तुमचे सिम कार्ड बंद होणार असल्याची भिती घातली. त्या निमित्ताने पोलिसांकडे तक्रारी करता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा करुन अन्य एका आपल्या साथिदारामार्फत फिर्यादीला तुमचे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यातून 2 कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाल्याची भिती घातली. त्यानंतर फिर्यादीला त्या खात्यामध्ये रक्कम भरण्यस भाग पाडून ही फसवणूक केली होती.
याप्रकरणी सायबर पोलिस तपास करत असताना त्यांना बँकांकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाव्दारे संशयित हा दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी जाउन कोणत्याही प्रकारचे मोबाईल लोकेशन प्राप्त नसताना स्थानिक बातमीदार तयार करुन संशयिताला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास व संशयिताला अटक करण्यासाठी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखली सायबर पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्मिता सुतार,पोलिस हवालदार रामचंद्र वडार,संदिप नाईक,रमिज शेख पोलिस काँस्टेबल रोहन कदम,रामदार पिसे यांनी केली.










