चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील काविळतळी विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख शुभम खंडझोडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे खासदार नारायण राणे यांनी स्वागत केले. यामुळे सेनेला येथे खिंडार पडले आहे.
भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप भिसे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. शुभम खंडझोडे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते यश खंडझोडे, तेजस खंडझोडे, वेद सुर्वे, सुरेश पवार, शौर्य भिसे, साहिल भिसे, राज भिसे, उमेश खंडजोडे, अंकुश चौधरी आदी भाजपवासी झाले. यावेळी भाजपचे रत्नागिरी जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा चित्रा चव्हाण उपस्थित होते या पक्षप्रवेशानंतर खासदार राणे यांनी भिसे यांचे कौतुक करीत पक्षवाढीसाठी सर्वांनी जोरदार प्रयत्न करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. पक्ष वाढवताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण आवश्यक ते सहकार्य नेहमीच करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.












