Guhagar: ‘भारती शिपयार्ड’च्या कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी निलेश राणे गुहागरात

Nilesh Rane in Guhagar to know the questions of the workers of ‘Bharati Shipyard’

गुहागर | प्रतिनिधी : दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आज गुहागरला भेट दिली.

यावेळी दाभोळ ग्रामपंचायत सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच श्रीमती दाभोळकर, उपसरपंच श्री. जावकर. भाजपचे उत्तर रत्नागिरीचे कार्याध्यक्ष केदार साठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रविण नलावडे आदि कामगार नेते व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेकडो कामगार उपथित होते.

निलेश राणे यांनी कामगारांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आणि आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.