खेड(प्रतिनिधी)मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटातील अवघड वळण लवकरच काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या रत्नागिरी कार्यालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय पत्रकार कार्यशाळेत ते बोलत होते.
महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर अनेक अपघात होतात व त्यात आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले आहे की, या घाटाचे सर्वेक्षण झाले असून, महामार्ग प्राधिकरण अधिकारी या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करतील आणि पर्यायी सुरक्षित रस्ता भोस्ते घाटात तयार करण्यात
येईल.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, ठाणे येथील रवींद्र पाठक, रत्नागिरी माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.











