चौके – प्रतिनिधी:- समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 300 व्या जयंतीनिमित्त आणि डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने अहिल्याबाई भीम पर्वाचे आयोजन मा.डॉ.पी.एन.खरात यांच्या अध्यक्षतेखाली दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन ओरोस येथे नुकतेच करण्यात आले होते. या निमित्ताने महाराष्ट्रातील कला,साहित्य,संमेलन,समाज प्रबोधन,जनजागृती, शिक्षण,उद्योग व समाज यांचे संवर्धन करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र निवृत्त प्राथमिक शिक्षक श्री.विजय चौकेकर यांना *मातृभूमी समाज सेवा गौरव पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले .शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. विजय चौकेकर हे अनेक वर्ष सर्वसामान्य जनतेच्या मनातील अंधश्रद्धा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा संघटक म्हणून व्याख्यानाच्या माध्यमातून दूर करण्यासाठी जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे काम करीत आहेत . तसेच जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती PIMC सिंधुदुर्ग यांच्या वतीने जादूटोणा कायदा प्रचारक म्हणून जिल्ह्यात व जिल्हा बाहेर जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान देत आहेत आणि गावागावात विद्यार्थी आणि जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.याची दखल समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग यांनी घेतली आणि त्यांना प्रमुख मान्यवरांचे उपस्थित मातृभूमी समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .यावेळी विचार मंचावर मा.सुनील गोडबोले सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते,श्री डाँ . बी.एन.खरात संचालक समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग श्री.एन.जी. खरात उद्योजक पुणे,श्री.संदीप राक्षे दिग्दर्शक निर्माता लेखक , संजय खोटलेकर अध्यक्ष पंचशील ट्रस्ट सिंधुदुर्ग,श्री दशरथ शिंगारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते,अजय नाईक सुप्रसिद्ध गीतकार गझलकार गोवा,यशवंत शेळके प्रदेशाध्यक्ष भ.वि.ज.महासंघ कोल्हापूर,बिरदेव ढोणे आयपीएस उत्तीर्ण अधिकारी आदी मान्यवर उपस्थितीत होते .










