दि.९ ते २७ मे या कालावधीतील अतिवृष्टीमुळे तालुक्यात १० लाख २८ हजार ६६३ रुपयांचे नुकसान 

संतोष कोत्रे lलांजा -: दिनांक ९ मे ते २७ मे या कालावधीत पडलेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे लांजा तालुक्यातील घरे, गोठे, संरक्षक भिंती त्याचप्रमाणे सार्वजनिक मालमत्ता यांचे एकूण १० लाख २८ हजार ६६३ रुपयांचे नुकसान झाले आहे . याबाबतची नोंद लांजा तहसील कार्यालयात करण्यात आली आहे .

यावर्षी मान्सूनपूर्वकाळात कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील पक्या घरांचे अंशतः नुकसान झालेल्यांमध्ये लवू भालेकर केळवली यांचे रुपये २०,३००, विलास खामकर आरगाव- ३५, ६००, रिहान पठाण साटवली यांचे ८००० रुपये, गोपाळ कांबळे कोर्ले यांचे ८५०००, सखाराम लांबोरे केळंबे ७५८९ रुपये, तय्यब बरमारे साटवली यांचे ३०००० रूपयांचे नुकसान झाले. संतोष वारीशे- शिरवली‌ यांचे १०२१३, बाळकृष्ण मांडवे कोंडये- १२,४००, प्रमोद गांगण भांबेड यांचे ९४,५०० आणि विजय राऊत- बापरे २५००० रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच तालुक्यातील पाच गुरांच्या गोट्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये विजय कांबळे -बौद्धवाडी तर्फे देवधे यांचे १९०००, नारायण अपकरे रुण यांचे १५३६०, रामदास खामकर आरगाव- ३०००० रूपये, सदानंद खामकर आरगाव – ९३५० रुपये,

आणि प्रदीप कांबळे पालू-७६८५० रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे संरक्षक भिंत कोसळूण झालेल्या नुकसानीमध्ये ग्रामपंचायत कोर्लेचे ५०००० रुपयांचे नुकसान झाले. मुकुंद जाधव प्रभानवल्ली यांचे ७००००, उमाजी इंदवटकर, इंदवटी यांचे ३३५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.उर्दू शाळा लांजाचे ४१०० आणि नौशाद नेवरेकर धुंदरे यांचे १३७०० रुपयांचे नुकसान झाले.

त्याचप्रमाणे चार ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. यामध्ये उर्मिला माने विद्यालय आसगेचे २१०२३ रूपये, जि प शाळा साटवली नंबर १ चे २३२५६ रुपये, शाळा भांबेड नं. १ चे १०३५० रुपये आणि जिप शाळा वेरळचे ३००००० रूपयांचे नुकसान झाले आहे. खावडी येथील रमाकांत सकपाळ यांच्या शौचालयाचे १०,२०० रुपयांचे नुकसान झाले असून धुंदरे येथील यास्मिन इसानी

यांच्या अन्नधान्याचे १३ हजार ३८० रुपयांचे नुकसान झाले आहे.

अशाप्रकारे दिनांक ९ मे ते २७ मे या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे लांजा तालुक्यातील एकूण १९ घरे, ५ पाच संरक्षक भिंती, ५ गोठे, त्याचप्रमाणे चार सार्वजनिक मालमत्ता एक शौचालय आणि अन्नधान्य अशा एकूण १० लाख २८ हजार ६६३ रुपयांचे नुकसान झाले आहे.