राजापूर Breaking: अणस्कुरा घाटात इरटिका कारला अपघात, एक जण ठार

कार सुमारे दिडशे फुट खोल दरीत कोसळून झाला अपघात

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील पाचल अणस्कुरा मार्गावर अणस्कुरा घाटात इरटिका कार सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भिषण अपघातात एक जण ठार झाला आहे.

 

हा अपघात झाल्याचे कळताच पोलिस निरिक्षक अमित यादव यांसह पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू झाले आहे.

कोल्हापूरकडून पाचल कडे येत असताना हा अपघात झाला असून नेमका अपघात किती वाजता झाला हे कळून आलेले नाही.

मृत व्यक्ती लांजातील असल्याचे समजते