रत्नागिरीतील रेशन दुकानदारांच्या समस्येबाबत तातडीने बैठक आयोजित करा

आ. शेखर निकम यांच्या मागणीचे ना. छगन भुजबळ यांना दिले पत्र

रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव कदम यांच्या हस्ते झाले सादर

मुंबई : मुंबई येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या समस्येबाबत तातडीने बैठक आयोजित करण्यासंदर्भात चिपळूण संगमेश्वरचे आमदार श्री. शेखर निकम यांनी ना. भुजबळ यांचे खाजगी सचिव श्री. चिंचोळकर व श्री. नरसीकर स्वतः पत्र व्यवहार करून तातडीची बैठक घेण्यासंदर्भात विनंती केली आहे.

सदरचे निवेदन रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री. अशोकराव कदम जिल्हा संघटनेचे खजिनदार श्री. रमेश राणे व मान्यवर यांनी संबंधिताना दिले.