कु.वेदान्त च्या वाढदिवशी केले गेले वृक्षारोपण

सलग सातव्या वर्षीही वक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनासाठी केला अनोखा उपक्रम

आचरा | अर्जुन बापर्डेकर : निसर्गाच्या बदलत्या स्थितीला पर्यावरणाची होणारी -हास कारणीभूत असूनही विकासाच्या नावाखाली आपण हजारो झाडांची कत्तल करत आहोत. याचा परिणाम निसर्ग चक्रावर होत आहे. यामुळे पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे बनले आहे.या दृष्टीनेच कु वेदान्त बापर्डेकर च्या वाढदिवशी दरवर्षी वक्षारोपण, रोपांचे वाटप करत पर्यावरण संवर्धनासाठी बापर्डेकर कुटूंबीय खारीचा वाटा उचलत आहेत.
सोमवारी पाच जूनला याचीच पुनरावृत्ती करत
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वेदान्त बापर्डेकरच्या सातव्या वाढदिवशी बापर्डेकर कुटुंबाकडून कणकवली येथील कोरल अपार्टमेंटच्या आवारात वृक्षारोपण केले गेले.या अनोख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला.यावेळी सौ अंजली बापर्डेकर, दत्ता डेगवेकर,,दत्ताराम जाधव,सविता डेगवेकर, रमेश पेडणेकर, सौ पेडणेकर,सुधाकर मेस्त्री, दत्ताराम राणे,सौ विजया राणे,स्वानंद करंबेळकर,
यांसह कोरल अपार्टमेंटचे सदस्य उपस्थित होते.