द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट तर्फे मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर

मुंबई : द सेंट्रल रेल्वे तिकिट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने दिनांक १४ जून २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वे सभागृह, पार्सल बिल्डिंग, चौथा मजला, प्लॅटफॉर्म क्रमांक १३/१४ येथे पार पडणार आहे.

 

या शिबिरात UPSC, MPSC, SSC, बँक, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर माहिती, मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. १०वी व १२वी नंतरचे करिअर पर्याय, व्यक्तिमत्व विकास, तसेच सरकारी नोकऱ्यांसाठी आवश्यक अभ्यासपद्धती, अर्ज प्रक्रिया, परीक्षांचे प्रारूप व आधी करावयाचे कोर्सेस यावर मार्गदर्शन केले जाईल.

 

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रशासन हे देशसेवेचे प्रभावी माध्यम आहे, या भावनेतून UPSC आणि MPSC परीक्षांची निवड का करावी, यासंदर्भात प्रेरणा दिली जाईल. या शिबिराचे उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन श्री प्रविन्द्र वंजारी (IRTS), वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे, मुंबई आणि श्री बी. अरुण कुमार (IRTS), वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक (वर्क्स), मध्य रेल्वे, मुंबई यांच्याहस्ते होणार आहे.

 

शिबिरात मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वप्निल निला (IRTS), मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई; श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सीमा शुल्क, मुंबई; श्री विकास सावंत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक; श्रीमती जान्हवी कोलते, सहाय्यक प्राध्यापिका, राजशास्त्र विभाग, किर्ती महाविद्यालय, मुंबई; प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण, संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई; श्री गौरव साळवी, सहाय्यक प्राध्यापक, माहिती व तंत्रज्ञान विभाग, किर्ती महाविद्यालय, मुंबई आणि प्रा. अमेय सुनिल महाजन, समाजकार्य अभ्यासक्रम समन्वयक, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, किर्ती महाविद्यालय, मुंबई हे उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आपली नोंदणी लवकरात लवकर खालील व्यक्तींशी संपर्क साधून करावी. संपर्कासाठी रोहिणी राणे – ९७०२१५९६९०, लोचन – ९८६९७१४१०७, बाला पिल्लाई – ९९६७१६२४०८, प्रसाद करलकर – ७७३८३१३८९५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

 

हा उपक्रम श्री डी. व्ही. चिंदरकर (अध्यक्ष – ८६९३०९२२११), श्री एच. एम. मोंडकर (सचिव – ९१६७०८९०३६), श्री जी. बी. कदम (खजिनदार – ८१०८५१८०००) तसेच सर्व ट्रस्टी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे.

 

सदर मार्गदर्शन शिबिर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.