तहसीलदार अर्चना बोंबे यांच्याकडून नियोजनबद्ध कार्यक्रम
दापोली l प्रतिनिधी :दापोरी तालुका महसूल विभागाकडून विविध दाखल्यासाठी तालुक्यात दाखले शिबिरांच आयोजन करण्यात आला आहे. तहसीलदार अर्चना बोंबे यांच्याकडून हे आयोजन करण्यात आला आहे दापोली तालुका महसूल विभागाच्या तहसीलदार कार्यालयाने कोकण विभागात 100 दिवसाच्या कामातही पहिला क्रमांक मिळवला आहे. गती बोल असलेल्या तालुक्याच्या महसूल विभागाने आता विद्यार्थ्यांसाठी गावातच दाखले मिळावे त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे.
सन 2025-2026 या महसुली वर्षामध्ये महसुल प्रशासन अधिक लोकभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी शासनाकडून प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणेबाबत निर्देश दिलेले आहेत. सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजुर यांचा त्यांच्या दैनदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसुल विभागामध्ये क्षेत्रिय कार्यालयाशी नेहमी संबंध येत असतो. गावागावातील तळागाळातील जनतेस पारदर्शक व महसुल विषयक विविध सेवा तसेच विविध दाखले, ॲग्रीस्टॅक (शेतकरी नोंदणी) वगैरे करणेकरीता यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाअंतर्गत दापोली तालुक्यातील क्षेत्रिय स्तरावर खालीलप्रमाणे शिबीराचे अयोजन करण्यात आले आहे
हे दाखले काढण्यासाठी लावण्यात येणारे शिबिर याचे नियोजन पुढील प्रमाणे आहे
मंडळाचे नाव कॅम्पचे ठिकाण दिनांक कार्यक्षेत्र
1 कॅम्प दापोली आर. आर. वैदय हायस्कुल, दापोली 09.06.2025 महसुल मंडळातील सर्व गावे
2 दाभोळ जिल्हा परिषद शाळा, उंबर्ले 11.06.2025 महसुल मंडळातील सर्व गावे
3 हर्णे ग्रामपंचायत कार्यालय, हर्णे 11.06.2025 महसुल मंडळातील सर्व गावे
4 आंजर्ले पि.डी. विदयालय, केळशी 12.06.2025 महसुल मंडळातील सर्व गावे
5 बुरोंडी करजगांव हायस्कुल करजगांव 13.06.2025 महसुल मंडळातील सर्व गावे
6 आगरवायंगणी आगरवायंगणी, कुणबी भवन 13.06.2025 महसुल मंडळातील सर्व गावे
7 देगांव देगांव, कुणबी भवन 16.06.2025 महसुल मंडळातील सर्व गावे
8 वेळवी ग्रामपंचायत कार्यालय, कुडावळे 16.06.2025 महसुल मंडळातील सर्व गावे
9 वाकवली ग्रामपंचायत कार्यालय, वाकवली 17.06.2025 महसुल मंडळातील सर्व गावे
10 पालगड प.पु. श्री. साने गुरुजी विदयालय पालगड 20.06.2025 महसुल मंडळातील सर्व गाव
शिबीरामध्ये खालील प्रकारच्या महसुल विषयक सेवा / दाखले पुरविण्यात येणार आहेत.
• जात प्रमाणपत्र (ST/SC/SBC/OBC/VJNT/EWS/SCBC)
• उत्पन्न प्रमाणपत्र
• अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
• नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र
• सामाजिक अर्थसहाय्य योजना (संजय गांधी योजना /श्रावण बाळ योजना)
• शिधापत्रिका वाटप
• जिवंत 7/12, फेरफार, 8अ वितरण
• ॲग्रीस्टॅक नोंदणी
• एकुपनोंदी /वारसनोंदी
• निसप्र विषयक नोंदी (वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करणे)
• अतिक्रमित बंद रस्ते सुरु करणे, अनुक्रमांक देणे व 7/12 वर नोंदणी करणे.
वरील प्रमाणे महसुल विषयक विविध सेवा /दाखले यांचे प्रस्ताव तयार करुन लाभार्थ्यांना पारदर्शक पध्दतीने वितरण करण्याचे कामकाज सदर शिबीरांमध्ये करण्यात येणार आहे.
तरी वरील नमुद केलेल्या दिनांकास क्षेत्रिय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी महसुल मंडळातील नागरीकांनी आवश्यकत्या कागदपत्रासह उपस्थित राहून महसुल विषयक विविध सेवा /दाखले प्रमाणपत्र यांचा लाभ घ्यावा व महसुल प्रशासनास सहाकार्य करावे. असा आवाहन दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी केले आहे.








