रत्नागिरी | प्रतिनिधी :रविवारी सकाळी आठ वाजता मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटामध्ये एलपीजी गॅस वाहून देणारा कंटेनर आणि मिनी बस यांच्यात भीषण अपघात झाला होता. यामध्ये कंटेनर मधून एलपीजी गॅस बाहेर पडला होता आणि मोठा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हा मार्ग वाहतुकीसाठी पोलीस विभागाने बंद केला होता. तत्काळ अपघातग्रस्त टँकर बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आले होते. तर या मार्गावरील वाहतूक पाली आणि संगमेश्वर येथून वळवण्यात आली होती. दरम्यान संध्याकाळी पाच वाजता सुद्धा महामार्गावरील या भागातील वाहतूक अद्यापही बंद असल्याचं पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.











