रत्नागिरी येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणाची शिक्षकांकडून प्रशंसा

गौरव पोंक्षे l माखजन :  रत्नागिरी येथे सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे तर्फे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचे मार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी चे प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक,कला क्रीडा गटात प्रशिक्षण सुरू आहे.हे प्रशिक्षण फाटक व पटवर्धन हायस्कूल येथे सुरू आहे.

विशेषतः कला क्रीडा ,उच्चमाध्यमिक गटात प्रशिक्षण देत असलेल्या सुलभक प्रा प्रभात कोकजे,प्रा सागर पोकळे,प्रा सौ मानसी गानू ,प्रा सुनील जोपळे आदी अतिशय उत्तम रित्या मार्गदर्शन करत असल्याने या गटाकडून सुलभकांची प्रशंसा होत आहे.

दरम्यान या गटातून सात दिवसानंतर पुढील प्रशिक्षणासाठी कोल्हापूर येथे रवाना झालेल्या कला,क्रीडा शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या.हे प्रशिक्षण डाएट चे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर,मुख्य समन्वयक श्री राहुल बर्वे,राजेंद्र लठ्ठे, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.