राजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान

राजापूर / प्रतिनिधी – तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीत सह अन्य दोन वाड्यांत अज्ञात चोरट्यानी एकाच रात्रीत पाच घरे फोडुन सुमारे सात लाखांचा मुद्देमाल पळवल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . मंगळवार दिनांक ०९ जुन २०२५ च्या मध्यरात्री ही चोरी झाल्याने राजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहीले आहे .
राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौध्दवाडी व मधलीवाडी येथील रहिवासी कोंड्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक महाडेश्वर , ॲड . मुरलीधर मोरे , योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे अशी पाच घरे फोडुन चोरट्यानी सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे . याबाबतची माहिती येतील ग्रामस्थानी राजापूर पोलिसाना देताच राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अमित यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत .
गेल्या अनेक दिवसानंतर राजापूरात मोठी घरफोडी झाल्याने पुन्हा चोरट्यानी आपला मोर्चा राजापूरकडे वळवला आहे . एकाच रात्रीत पाच बंद घरे चोरट्यानी फोडल्याने राजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले आहे . आता या चोरी प्रकरणाचा राजापूर पोलीस कसुन तपास करत असुन चोरट्यांसह मुद्देमाल कधी पोलिसांच्या हाती येइल याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे .













