दापोली । प्रतिनिधी :उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरीता 20 हजारांची लाच मागणाऱ्या सजा केळशी, अतिरिक्त कार्यभार मांदिवलीचे ग्राममहसूल अधिकारी (तलाठी )राजेंद्र उंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले
उपलब्ध माहितीनुसार तक्रारदार यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरीता ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राजेद्र उंडे, सजा केळशी अति. पदभार मांदीवली यांनी तक्रारदार यांचेकडे दि. ०५/०६/२०२५ रोजी वीस हजार रुपयांची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कम मंगळवार दिनांक 10/06/2025 रोजी स्विकारणाचे मान्य केलो होते. त्यानुसार मागणी केलेली लाच रक्कम 20 हजार रुपये ग्राम महसूल अधिकारी उंडे यांनी आज दिनांक 10 /06/2025 रोजी पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र उंडे यांना 14.30 वाजता पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सापळा अधिकारी मच्छिंद्र जाधव ,पोलीस निरीक्षक लाप्रवि रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली सापळा पथकात 1) सहाय्यक फौजदार चांदणे, 2)पोहवा संजय वाघाटे, 3) पो हवा. विशाल नलावडे 4) म पो हवा. श्रेया विचारे 5) पो हवा दीपक आंबेकर ६) पो कॉ. हेमंत पवार ७) पो. कॉ. राजेश गावकर ८) म पो. कॉ. समिता क्षीरसागर 9) चा पो ना प्रशांत कांबळे यांचा सहभाग होता.











