गुहागर l प्रतिनिधी: तालुक्यातील शिवणे येथील भागोजी गोविंद जोशी यांच्या मालकीचा बैल सोमवारी सकाळी 11 वाजता लगतच्या जंगलात चरावयास सोडण्यात आला होता. यावेळी जंगलात खाली पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने भागोजी गोविंद जोशी यांचे अंदाजे 20 हजाराचे नुकसान झाले आहे. शेतीच्या हंगामात बैल मेल्यामुळे जोशी यांचे मोठे नुकसान झाले आहे.










