विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषामध्ये पालकांच्या समवेत केली सागराची पूजा व प्रार्थना……
गुहागर l प्रतिनिधी :रत्नागिरी जिल्ह्यातील एक उपक्रमशील, आनंददायी डिजिटल व्हर्च्युअल स्कूल म्हणून नावलौकिक असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श उपक्रमशील आनंददायी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्थानिक लोकांचा नारळी पौर्णिमा सर अत्यंत उत्साह पूर्ण व जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.विद्यार्थ्यानी वाद्यवृत्ताच्या व संगीताच्या तालावर नृत्य करीत पारंपारिक वेशभूषामध्ये सागराची विधिवत पूजा केली . सागराला आकर्षक नारळ अर्पण करण्यात आला.समुद्र देवाची प्रार्थना केली.त्यावेळी विविध कोळी नृत्य सादर करण्यात आली.त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला .विद्यार्थी पारंपारिक कोळी वेशभूषा मध्ये शाळेमध्ये दाखल झाले.वाद्य वृंदाच्या साथीने संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनीची आनंददायी वातावरणामध्ये अभूतपूर्व नृत्य करीत सागरापर्यंत शोभायात्रा आयोजित करण्यात आली.
.विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. उपस्थित सर्वांच्या आनंदाला उधाण आले होते.नारळी पौर्णिमा या सणाचे मच्छीमार समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.सदर दिवशी सागराची मनोभावे पूजा केली की सागर प्रसन्न होतो, समुद्राचे पाणी एक माड कमी होते ,सागराचे उधाण कमी होऊ लागते ,समुद्र हळूहळू शांत होऊ लागतो, सागराची मच्छीमारांवरती कृपादृष्टी वृद्धिंगत होते व मच्छीमारांचा मच्छी मारण्याचा मार्ग सुकर होतो .मच्छीमारांचे जीवन भवितव्य सर्वस्वी सागरावर अवलंबून असते .मच्छीमार लोक या दिवसाच्या शुभमुहूर्तावर सागरामध्ये आपल्या होड्या व यांत्रिकी बोटी मार्गस्थ करतात.सदर कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .सदरचा कार्यक्रम मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले .अशाच प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित व्हावेत अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात आली.त्यावेळी मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून वेलदूर ग्रामपंचायतचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरजी कोळथरकर, आर जी पी एल कंपनीचे अप्पर महा प्रबंधक आनंद मारुती मळक साहेब, अप्पर महाप्रबंधक उमाशंकर भारद्वाज साहेब, पब्लिक रिलेशन अधिकारी अमृता बोराडे मॅडम ,उपप्रबंधक अमित शर्मा साहेब, शिक्षक वृद्ध अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे ,सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते









