मॅरेथॉनमधील धावपट्टू प्रसाद देवस्थळी यांचे आज रत्नागिरीत होणार स्वागत

रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेतील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची कॉम्रेड्स मॅरेथॉन वेळेत पूर्ण करणारे प्रसाद देवस्थळी यांचे उद्या (ता. १३) रत्नागिरीत जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता साळवी स्टॉप येथून मारुती मंदिरपर्यंत दुचाकी फेरी काढून मारुती मंदिर येथे सत्कार करण्यात येणार आहे.

 

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक देवस्थळी यांनी कॉम्रेड आंतरराष्ट्रीय शर्यत पूर्ण करून रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे. पिटर्समारीबर्ग ते डरबन या ९० किलोमीटर अंतराच्या या कठीण शर्यतीत, चढउतार, अडथळे आणि तापमानातील मोठ्या फरकाचा सामना करत ही शर्यत पूर्ण केली. याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि मॅरेथॉन टीमतर्फे साळवी स्टॉप येथून दुचाकी फेरी काढून जंगी स्वागत केले जाणार आहे. रत्नागिरीकरांना आवर्जून या फेरीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.