माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे ॲड.जमीर खलिफे व भाजपाचे अरविंद लांजेकर यांचा विशेष पाठपुरावा
वाहन चालकांतुन समाधान
राजापूर (प्रतिनिधी): मुंबई गोवा महामार्गावरील कोदवली पेट्रोलपंपासमोरिल उड्डाण पुलाच्या एका बाजूकडील रखडलेले काम पूर्ण होवून आता या पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे आणि भाजपाचे युवा कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केले होते. दोन्ही बाजुंनी वाहतुक सुरू झाल्याने वाहन चालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात राजापूर हद्दीतील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. राजापुरातील कोदवली पेट्रोलपंपासमोरिल उड्डाणपुलाच्या एका बाजूकडील काम काही तांत्रिक अडाणींमुळे रखडले होते. त्यामुळे या पुलाच्या एका बाजूने वाहतूक सुरू होती. पुलाच्या एका बाजूने जाणारी व येणारी वाहने मार्गकमण करत असल्याने अपघाताचा धोका होता. त्यामुळे रखडलेले काम पूर्ण करून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत होती. यासाठी राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांसह लांजेकर यांनी महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केला होता.
या पुलाच्या एका बाजुचे रखडलेले काम सुरू काम सुरू करण्यात आले होते. मात्र ते अत्यंत संथ गतीने सुरू होते. याबाबत एड. खलिफे व लांजेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.कुमावत यांच्याशी चर्चा करून प्रत्यक्ष पहाणी केली होती. सदरचे काम लवकारात लवकर काम पूर्ण करून वाहतून सुरू करण्यी मागणी केली होती. आता हे काम पुर्ण झाले आहे.
सोमवारपासून उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूनेही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. राजापूरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व महामार्ग तसा कंपनी अधिकारी यांच्या उपस्थितीत वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी एड. खलिफे यांसह शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, अरविंद लांजेकर, सुभाष बाकाळकर, शैबाज खलिफे, भरत लाड, अजीम जैतापकर, शैलेश साळवी, लीलाधर गुरव, रवींद्र सावंत, श्री.आंबोळकर यांयासह सार्वजनिक बांधकाम विभागो अभियंता श्री.कुमावत, ठेकेदार कंपनीचे श्री.मनिंदर व श्र. शर्मा आदी उपस्थित होते.
आमदार किरण सामंत यांचेही विशेष प्रयत्न
या कोदवली पेट्रोलपंपासमोरिल उड्डाणपुलावरिल रखडलेले काम तातडीने पुर्ण करून या ठिकाणी दोन्ही बाजुने वाहतुक सुरळीत सुरू करावी यासाठी आमदार किरण सामंत यांनी विशेष लक्ष दिले होते. प्रत्यक्ष पहाणी करून याबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या.











