अंडर ग्राउंड लाईन टाकण्यासाठी खोदलेले चर धोकादायक : तीन प्रवासी अपघातग्रस्त
वेंगुर्ले l दाजी नाईक :वरचेमाड ते मोचेमाड येथील तिलारी पाण्याची पाईप लाईन चा पॉवर पंप शुद्धीकरण पंप हाऊस बांधले आहे, त्यासाठी ११ के वी वीजपुरवठा लागणार आहे, त्यासाठी वरचेमाड ते मोचेमाड अशी अंडर ग्राउंड लाईन टाकण्यासाठी मे अखेरीस ते जून १० तारीख पर्यंत काम चालू होत, खोदाई मुळे चर व्यवस्थित बुजवले नाहीत. परिणामी गटार नीट न बुजल्याने कालच्या मुसळधार पावसात गटातील भले मोठे दगड माती रस्त्यावर आल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. यामुळे आज तीन प्रवासी अपघातग्रस्त बनले आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी आणि वाहन चालकांकडून होत आहे.
घाटीमधील वळणाचा हा भाग असल्याने उतार व चढावावर येणाऱ्या वाहनाना अंदाज नसल्याने दगडावर मातीत पडून आदळून तीन जन आज किरकोळ जखमी झाले, तसेच गाड्यांचेही नुकसान झाले.











