चिपळूण नगरपरिषदेचा पुढाकार
चिपळूण (प्रतिनिधी):– शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने व काम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण नगर परिषद नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात चिपळूण नगर परिषद आरोग्य विभागातील स्वच्छता दूत यांच्यासाठी पायाभूत स्वच्छता प्रशिक्षण व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी काम फाउंडेशनच्या संचालिका डॉ. स्मिता सिंग, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, शहर अभियंता दीपक निंबाळकर, सोहम पाटील, अग्निशमन अधिकारी आनंद बामणे काम फाउंडेशन प्रतिनिधी प्रसन्न येवलेकर, श्याम राठोड आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, टी. टी. इंजेक्शन इत्यादी सेवा देणेत आले. या शिबिराकरिता दीपक किंजळकर, मधुकर मोहिते, दीपक जाधव, रोहन सकपाळ, संकेत मोहिते, रोहन सकपाळ, सागर सावंत, अनिल खापरे, राजेंद्र नवरत, शशिकांत चांदिवडे, मनीष जाधव, तुषार जाधव, व श्वेता किल्लेकर आदींनी मेहनत घेतली.












