वन विभागाच्या बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक आधिवासात सोडले
चिपळूण (प्रतिनिधी):– तालुक्यातील तनाळी राधाकृष्णवाडी येथील सहदेव धोंडू बाईत यांचे घरामागच्या विहीरीत बिबट्या पडला असल्याचे रविवारी सकाळी समोर आले. त्यानंतर याबाबतची माहिती येथील ग्रामस्थांनी वन विभागाला देताच वन विभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी गाव घेत या बिबट्याला विहिरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
तनाळी राधाकृष्णवाडी येथील सहदेव बाईत यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्या असल्याचे सौ. सनवी सुरज बाईत यांच्या सकाळी ९.०० वाजता निदर्शनास आला. यानंतर याची माहिती पोलिस पाटील राजेश थरवळ यांना देण्यात आली.
त्यांनी ही माहिती वन विभागाला दिली. यानंतर वन परिमंडळ अधिकारी चिपळूण एस.एस. सावंत, वन परिमंडळ अधिकारी फिरते पथक रत्नागिरी चिपळूण चे जी.एम. पाटील, वनरक्षक फिरते पथक दत्ताराम सुर्वे, वनरक्षक रामपूर राहूल गुंठे, वनरक्षक अनंत मंत्रे, व वाहनचालक नंदकुमार कदम, संजय अंबोकर यांनी वन विभागाचे बचाव पथक सामग्री व अधुनिक पिंजऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली.
विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्यास काही वेळातच सुखरूप बाहेर काढले. विहरीमधून बाहेर काडल्यानंतर बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी श्री. कणसे यांनी पाहणी करून तो सुस्थितीत असल्याचे खात्री केली. सदर बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे अंदाजे वय दोन ते अडीच वर्षे असल्याचे सांगितले. सदर बिबट सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबत अहवाल दिला. त्यासअनुसरून वन विभागाचे बचाव पथकाने सदर बिबट्यास सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांचे समक्ष नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
या बचाव पथकास श्रीमती विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, व वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. खान चिपळूण यांचे मार्गदर्शन लाभले. मानवी वस्तीत बिबट आलेस किंवा संकटात सापडलेस त्याबाबतची माहिती वनविभागास कळविणेबाबत वनविभागामार्फत अहवान करणेत येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण एस. एस. खान यांनी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधवा असे आवाहन केले आहे.











