कणकवली :शहरातील हर्णे अळी येथील एका घरातील वॉशिंग मशीन ने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला आणि परिसरात खळबळ उडाली.
हर्णे आळी येथील नंदू हर्णे यांचे कुटुंबीय घर बंद करून नजीकच बाजारात गेले होते. दरम्यान काही वेळाने घरातून धूर येऊ लागला. तितक्यात घरी आलेल्या कुटुंबीयांनी पाहिले असता वॉशिंग मशीनने पेट घेतला होता. लागलीच आजूबाजूच्या नागरिकांनी घराकडे धाव घेतली आणि पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वी कुटुंब हरणे कुटुंबीय घराकडे परतल्याने पुढील अनर्थ टळला. नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. मात्र तत्पूर्वी नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती.













