दिलीप प्रभावळकरांचा गूढ अवतार… दशावतार! 

गावकुसापासून देवभूमीपर्यंतचा प्रवास सुरू होतोय…

परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावलेली एक भव्य गाथा पडद्यावर साकारली जातेय… कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान कलाकाराचा अवतार धारण होतोय…. हा अवतार म्हणजेच

*दशावतार*!!!

 

चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू या आणि अशा अनेकविध भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर सजीव करणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर वयाच्या या टप्प्यावर पुन्हा एका नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा ही वेगळीच भूमिका असून *दशावतार* मधून रसिकांना ते पुन्हा आश्चर्यचकित करणार आहेत.

 

झी स्टुडियोज् प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित *दशावतार* हा चित्रपट १२ सप्टेंबरला रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

 

या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. तर चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे आहेत.

 

या चित्रपटाची पहिली झलक लवकरच झी मराठीवर रसिकांना पाहायला मिळणार आहे.