माखजन इंग्लिश मिडीयम मध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत

गौरव पोंक्षे l माखजन :      संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले.विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव दीपक पोंक्षे,इंग्लिश मिडीयम स्कूल च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक शिगवण,मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले व सहकारी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.