करुळ घाटात ट्रकला अपघात : मात्र मोठा अनर्थ टळला.

वैभववाडी | प्रतिनिधी : चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक दरीकडील बाजूस कटड्याला जोरदार आदळला नशीब बलवत्तर म्हणूनच ट्रक चालक बचावला. त्याच्यावर कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत

कोल्हापूरहून वैभववाडीच्या दिशेने (एमएच 09 बीसी 9150) हा ट्रक चालक करुळ घाट मार्गे घेऊन येत होता. घाटात पायरी घाट नजीक धोकादायक वळणावर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला व ट्रक दरीकडील कठड्यावर आदळला. ट्रकची दर्शनी बाजू दरीकडेच झुकली होती. या अपघातात ट्रक चालकाने रस्त्यावर उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ कोल्हापुर येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत करण्यात आली नव्हती.