या परीक्षेसाठी बसलेली लांजा नं.५ ही रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. ची एकमेव शाळा
संतोष कोत्रे l लांजा -: महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईड्स यांच्यातर्फे आयोजित चतुर्थ चरण (कब) शिबीर चाचणी चा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेमध्ये लांजा नं.५ या शाळेतील तब्बल १४ विद्यार्थ्यांनी यश संपदन करत शाळेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
सदर परीक्षा दि. २४ ते २६ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र सड्यामिऱ्या रत्नागिरी येथे घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी लांजा शाळा नं.५ चे एकूण १४ विदयार्थी परीक्षेसाठी बसले होते. १४ पैकी १४ विद्यार्थी चतुर्थ चरण परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत. यामध्ये वृषभ कांबळे, आयुष गुरव, सर्वेश कोपरे, सुधांशू आयरे, महादेव पाटील, आरुष चव्हाण, ऋग्वेद जाधव, विहान जाधव, राधेश कातकर, स्वयंम रेवाळे, क्रिशांत यादव, प्रल्हाद लांजेकर, आयुष पावसकर व कौस्तुभ मडवी यांनी यश संपादन केले आहे..
या चतुर्थ चरण परीक्षेसाठी बसलेली लांजा नं.५ ही रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. ची एकमेव शाळा आहे. ज्या शाळेतील विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते..या उज्ज्वल यशाबद्दल लांजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, लांजा कन्या केंद्राचे केंद्रप्रमुख पावसकर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . विमल चव्हाण, शा. व्य. समिती अध्यक्ष दिलीप चौगुले व सर्व सदस्य, पालकवर्ग व शाळेतील शिक्षकवृंद यांनी मुलांचे अभिनंदन केले. या विदयार्थ्यांना शाळेतील कब मास्टर शिक्षक चंद्रकांत साबळे यांचे मार्गदर्शन लाभले. कब मास्टर श्री. साबळे यांनी नॅशनल ट्रेनिंग सेंटर पचमढी, राज्य मध्यप्रदेश येथे प्रशिक्षण पूर्ण केले असून गेली अनेक वर्षे मुलांना कब मास्टर म्हणून काम करत आहेत.आजपर्यंत त्यांचे अनेक विदयार्थी जिल्हा, राज्य स्तरावर चमकले आहेत.










