नागरिक संतप्त : विक्रेत्याची फळे संतप्त नागरिकांनी फेकली ; पळून गेलेल्या फळ विक्रेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
मालवण | प्रतिनिधी : मालवण एसटी स्टॅन्ड नजीक फळ विक्री करणाऱ्या विक्रेता फळांवर थुंकून ती फळे विकत असल्याचा किळसवाणा प्रकार पाहून परिसरातील नागरीक संतप्त बनले. फळ विक्रेत्याला येथेच्छ प्रसाद देत सर्व फळे फेकून दिली.
त्या फळविक्रेत्याने तेथून पळ काढला. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. माहिती जाणून घेतली. आजूबाजुचे सीसीटीव्ही व अन्य माहिती घेऊन पोलीस तपास करत आहेत. दरम्यान,पोलिसांनी त्या फळ विक्रेत्याला ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी तपास सुरु होता.
मालवण एसटी स्टॅन्ड नजीक हातगाडी लावून फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून फळांवर थुंकले जात असल्याचा प्रकारकाही नागरिकांनी पहिला. हे आक्षेपार्ह कृत्यपाहून संतप्त नागरिकांनी जाब विचारला. त्याला समजेल अश्या भाषेत समज देण्याचा प्रयत्न केला. फळे रस्त्यावर फेकली. या दरम्यान फळ विक्रेता पळून गेला. याबाबत मालवण पोलीसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अधिक माहिती घेण्याचे काम सुरु होते. दरम्यान, या घटनेबात नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे.












