Ratnagiri: उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन

Inauguration of Panpoi by entrepreneur Kiran Samant

रत्नागिरी : शहरातील मुख्य बाजारपेठेत राम आळी येथे असणाऱ्या श्रीमान कन्हैयालाल गुंदेचा चॅरीटेबल ट्रस्टच्या पाणपोईचे नुतनीकरण करून उद्योजक किरणशेठ सामंत यांच्या हस्ते व रनप मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक निमेश नायर, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु, महेंद्रशेठ गुंदेचा व व्यापारी मोठ्या संखेने उपस्थित होते. २००३ साली हि पाणपोई श्रीमान कन्हैयालाल गुंदेचा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आली होती. मात्र या ठिकाणी काही फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून हि पाणपोई बंद पाडली होती. आता पुन्हा नव्याने या पाणपोईचे नुतनीकरण करून उद्घाटन करण्यात आले. यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या तहानलेल्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे.