Ratnagiri: स्किममध्ये गुंतवणूकीच आमिष दाखवून मुंबईतील महिलेने रत्नागिरीतील व्यक्तीला तब्बल ११ लाखाला फसवले; गुन्हा दाखल

A woman from Mumbai cheated a man from Ratnagiri of as much as 11 lakh by luring her to invest in a scheme; Filed a case

रत्नागिरी | प्रतिनिधी : स्किम मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फिर्यादीकडून वेळोवेळी असे एकूण 11 लाख रुपये घेउन फसवणूक केली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूकीची ही घटना 20 जानेवारी 2022 ते 7 जून 2023 या कालावधीत घडली आहे.

याबाबत फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,संशयित महिलेने फिर्यादीला फोन करुन आपले खडकपाडा कल्याण मुंबई येथे साई ऍडवायसरी अँड ईनव्हेस्टमेंट नावाचे ऑफिस असल्याचे सांगून फिर्यादीला अल्गो ऑप्शन स्टॅ्रटेजी मॉड्युल अर्न या स्किममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादीने त्या स्किममध्ये वेळोवेळी असे एकूण 11 लाख रुपये भरले.परंतू संशयित महिलेने या व्यवहाराबाबत फिर्यादी यांना कोणताही एम.ओ.यु करुन दिलेला नाही.तसेच फिर्यादीला रमकेच्या परताव्याची खात्री म्हणून धनादेश देखील देण्यात आलेला नाही.दरम्यान,फिर्यादीने संशयित महिलेकडे गुंतवणूक केलेल्या रकमेचा वारंवार पाठ-पुरावा केल्यावर तिच्याकडून कोणतीही हमी मिळत नसून रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने बुधवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी संशयित महिलेविरोधात भादंवि कायदा कलम 406,420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.