शशिकांत चव्हाण विधीज्ञ परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

खेड (प्रतिनिधी) शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित सिद्धीयोग विधी महाविद्यालयातून विधीज्ञ परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या शशिकांत चव्हाण इतर विविध क्षेत्रातही कार्यरत असून आजवर भरीव कामगिरी केली आहे. वकिली क्षेत्राकडेही त्यांचा कल होता. विधीज्ञ परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी जि. प. सदस्य अरूण कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.