तळवली l वार्ताहर :तालुक्यातील ग्रामपंचायत मुंढर येथे पंचायत समितीमार्फत महारष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते येथील प्रगतशील शेतकरी विजय भिकू रामाणे यांच्या शेतामध्ये चारसूत्री भात प्रात्यक्षिक घेण्यात आले तसेच
एक पेड मा के नाम अभियानांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे व तालुका कृषी अधिकारी श्री क्षीरसागर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे,विस्तार अधिकारी शरद भांड, कृषी विस्तार अधिकारी कृष्णदेव कदम,ग्रा.पं. अधिकारी सुरेश गोरे,सर्व कृषी मंडळ अधिकारी,सर्व सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामपंचायत मुंढर सरपंच आमिषा गमरे,
उपसरपंच भक्ती धनावडे, सर्व सदस्य माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिर्के , माजी सरपंच प्रमोद शिर्के,गुहागर तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष साईनाथ बागूल,कृषी महाविद्यालय खरवतेचे विद्यार्थी,सर्व अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका,मुंढर शाळेचे मुख्याध्यापक दशरथ कदम शिक्षक,ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे यांनी केले













