Ratnagiri: फिनोलेक्स अॅकॅडमीच्या ३१ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( टी. सी. एस ) या कंपनीमध्ये निवड

31 students of Finolex Academy selected in Tata Consultancy Services (TCS)

रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकण विभागातील सर्व स्तरावर अग्रेसर असणाऱ्या फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या एकूण ३१ विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.

टी सी एस ही जगातील आघाडीच्या इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी सेवा आणि सल्लागार कंपन्यांपैकी एक आहे. टी सी एस आणि फिनोलेक्स अॅकॅडमी यांच्यातील सहकार्य ही दोन्ही संस्थांसाठी एक उल्लेखनीय बाब आहे, टी सी एस द्वारे दरवर्षी शैक्षणिक संस्थेत भरती मोहीम आयोजित केली जाते. या वर्षीही भरती प्रक्रिया घेण्यात आली. त्यामध्ये फिनोलेक्स अॅकॅडमीमधील विद्यार्थ्यांची क्षमता आणि तांत्रिक कुशाग्र बुद्धिमत्ता ओळखून त्यांना ही अनोखी संधी देण्यात आली.

फिनोलेक्स ॲकॅडमीच्या कु. साक्षी माळवदे ( केमिकल ), कु. प्रणव बंदरकर ( इलेक्ट्रिकल ), कु. रसिका सावंत ( इलेक्ट्रिकल ), कु. पराग प्रभू ( इलेक्ट्रिकल ), कु. चिन्मय सांगेलकर ( इलेक्ट्रिकल ), कु. विराज दुकाळे ( इलेक्ट्रिकल ) , कु. दिया पोतदार ( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कॉम्युनिकेशन ), कु. प्रतिक कारंडे ( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कॉम्युनिकेशन ), कु. सुहाना शेख ( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कॉम्युनिकेशन ), कु. रीना पाटील ( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कॉम्युनिकेशन ), कु. सुहा मुकादम ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), कु. तन्मय गर्दे ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), कु. प्रियांका पाटणकर ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), कु. राज नारकर ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), कु. निवेदिता परांजपे ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), कु. वेद शिरगावकर ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), कु. प्रतीक्षा रणशूर ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), कु. श्रेया केडसकर ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), ऋषिकेश कदम ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), कु. मधुरा पाटील ( इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी), कु. प्राजक्ता ठाकूर ( मेकॅनिकल ), कु. प्रसाद सावंत-देसाई ( मेकॅनिकल ), कु. गिरीश परब ( मेकॅनिकल ), कु. राहुल पुजारे ( मेकॅनिकल ), कु. श्रेयस शिवतरकर ( मेकॅनिकल ), कु. जीवन पाष्टे ( मेकॅनिकल ), कु. मृण्मयी रावराणे ( मेकॅनिकल ), कु. निखिल नाईक ( मेकॅनिकल ), कु. स्वागत खुंडोल ( मेकॅनिकल ), कु. चिन्मय नाईक ( मेकॅनिकल ), कु. झियाद वाडेकर ( मेकॅनिकल ) ) या विद्यार्थ्यांची “टी सी एस” कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.

मेकॅनिकल, इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कॉम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी एक कठोर मूल्यमापन प्रक्रिया पार पाडली, ज्यामध्ये तांत्रिक मूल्यमापन, मुलाखती आणि इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी संदर्भातील समस्या सोडवणे या सारख्या गोष्टींचा समावेश होता.

फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा भक्कम शैक्षणिक पाय, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि उद्योगात यश मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये असलेल्या सुसज्ज व्यक्तींमध्ये घडवल्याबद्दल टी सी एस कंपनीने फिनोलेक्स अॅकॅडमीचे कौतुक केले.

फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ कौशल प्रसाद हे विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन करताना म्हणाले की “आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा खूप अभिमान आहे ज्यांनी टी सी एस मध्ये स्थान मिळवले आहे. ही कामगिरी त्यांच्या क्षमता आणि आम्ही फिनोलेक्स अॅकॅडमी, रत्नागिरी येथे देत असलेल्या शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल खूप काही सांगून जाते. ते पुढे म्हणाले की आम्ही यापुढेही आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या निपुण व कॉर्पोरेट जगतात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असणारे सॉफ्ट स्किल्स व इतर कौशल्ये विकसित करून त्यांचे सक्षमीकरण करत राहू.”

गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबरच नोकरीच्या अनेकोत्तम संधी उपलब्ध करून देणारी फिनोलेक्स अकॅडेमी संपूर्ण कॊकणामध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

ह्या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि अॅकॅडमीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.