जनतेला अभिमान वाटावे असे कार्य ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्गच्या विकासाची मुहूर्तमेढ राणे साहेबानी रोवली. आपल्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीने तसेच कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठसा उमटवला. विधानसभेतील त्यांच्या भाषणांचे संदर्भ विरोधकही घेतात. राणे साहेबांचा तोच वारसा आज आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे त्याच शैलीत समर्थ पणे पुढे नेत आहेत. गेल्या दहा वर्षात दुर्लक्षित असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघाला आमदार निलेश राणे यांच्या रूपाने संजीवनी मिळाली. विकासाला गती मिळाली. जनतेचा आवाज विधिमंडळात घुमला. जनतेला अभिमान वाटावा असे कार्य आमदार निलेश राणे अभ्यासपूर्ण कार्यातून महाराष्ट्र अनुभवतोय. अश्या भावना शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केल्या आहेत.
राणे साहेबांची जनतेप्रती जशी आत्मीयता आहे. आपुलकी आहे, तीच भावना आमदार निलेश राणे यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कृतीतून दिसून येते. जनतेचे प्रश्न प्राधान्याने सुटले पाहिजेत. यासाठी त्यांची असलेली तळमळ त्यांच्या कृतीतून दिसून येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न, वीज प्रश्न हे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जाणून ते अभ्यासपूर्ण भाषणातून सभागृहात मांडणाऱ्या आमदार निलेश राणे यांचा मालवण कुडाळच्या जनतेला सार्थ अभिमान निश्चितच वाटला. मागील दहा वर्षात हा मतदारसंघ विकासात मागे होता, विधिमंडळात आवाज नव्हता. मात्र आता हक्काचे नेतृत्व मालवण कुडाळला लाभले.
खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनात, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात हा मतदारसंघ विकासात अग्रेसर बनेल. सोबतच पालकमंत्री यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभा सोबत सिंधुदुर्ग जिल्हा विकासाची गरुडझेप घेईल हे निश्चित. अश्या भावना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केल्या आहेत.








