रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील जेलनाका येथे एसटी आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिद्धेश रमेश कदम (28, रा. राजेंद्रनगर, मारुती मंदिर, रत्नागिरी) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवार 3 जुलै रोजी रात्री 8.30 वा. सुमारास घडली. सिद्धेश कदम हा गुरुवारी रात्री आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एवाय -1524) वर पाठीमागे हर्षदा मोहित यांना घेऊन आठवडा बाजार ते मारुती मंदिर असा जात होता. तो जेल रोड येथे आला असता एसटी (एमएच-14 एलएक्स 7136) या बसला धडक झाली. यामध्ये सिद्धेश जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.










