भाजपच्या माध्यमातून सिंधुदुर्गनगरी येथे मोटर सायकल रॅली…

भाजप सरकारने नागरिकांसाठी राबविलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला असून पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रचारक म्हणून काम करा!

भाजप राज्य सचिव निलेश राणे!

सिंधुनगरी | प्रतिनिधी : यापूर्वी कधीही देशात पहायला व एकायला मिळाला नव्हता एवढा विकास गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. हे सांगण्यासाठी विकास तीर्थ उपक्रम अंतर्गत आज मोटार सायकल रॅली काढली आहे. देशातील नागरिकांसाठी भाजप सरकारने अनेक चांगला योजना रविला आहेत. येणारे वर्ष निवडणुकीचे आहे. देशात चारशे खासदार आणि राज्यात दीडशे आमदार आपल्याला आणायचे आहेत. त्यामुळे पक्षाचे प्रचारक बनून काम केले पाहिजे. आता पक्षाला देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. त्यामुळे प्रत्येक बुथवर भाजप पक्ष ५१ टक्के दिसला पाहिजे, असे आवाहन भाजप राज्य सचिव निलेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे बोलताना केले. यावेळी झाराप
कुडाळ ओरोस अशी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेली मोटर सायकल रॅली ही लक्षवेधी ठरली!
मोदी @ ९ अंतर्गत सावंतवाडी ते सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी भाजपच्या वतीने आज मोटार सायकल रॅली निलेश राणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, रणजित देसाई, सरचिटणीस संजू परब, कणकवली विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज रावराणे, युवा नेते विशाल परब, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, दीपक नारकर, संतोष वालावलकर, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला निलेश राणे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर येथील पुलाखाली भाषणे करण्यात आली. दरम्यान, रॅलीला मोठा प्रतिसाद लाभला होता.

देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मोदी@9 या अभियानांतर्गत ‘विकास तीर्थ’ कार्यक्रमाचे लोकसभा संयोजक मान. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर आणि पूर्ण झालेल्या मुंबई गोवा हायवेवरून झाराप ते ओरोस आज शनिवार दिनांक १० जून रोजी सकाळी ९.३०वाजता ‘भव्य मोटर सायकल रॅली’ काढण्यात आली.
यावेळी या मोटर सायकल रॅलीमध्ये लोकसभा प्रभारी मान. श्री प्रमोद जठार,प्रदेश सदस्य श्री बंड्या सावंत,जिल्हाध्यक्ष मान.श्री राजन तेली,महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे,भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री प्रभाकर सावंत,श्री मनोज रावराणे,श्री अशोक सावंत,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री भाई सावंत,श्री विशाल परब,श्री संजू परब,श्री रणजित देसाई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीचा सांगता सोहळा ही मान्यवरांच्या उपस्थितीत उरूस येथे झाला.