कोंडीवली नजीक रेल्वे रुळावर धावत्या गाडीतुन प्रवाशी कोसळला जागीच गतप्राण !

खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लोकमान्य टिळक कोचुवेली एक्स्प्रेस गरीब रथ या धावत्या गाडीतून प्रवाशी रेल्वे रूळावर पडून जागीच गतप्राण झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली

हरीश जयराम शेट्टी रा मिरा रोड ठाणे असे त्या जागीच गत प्राण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे हरीश हा गरीब रथ गाडी क्रमांक १२२०१ या गाडीने प्रवास करत असताना त्याचा तोल गेल्याने कोकण रेल्वे मार्गावरील कोंडीवली बौद्ध वाडी नजीक तो पडून जागीच गत प्राण झाला या प्रकारणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे